Chakan : जुन्या भांडणातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणातून दोघांनी तरुणाला बेदम मारहाण (Chakan) केली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक देखील केली आहे. हा प्रकार मंगळवारी(दि.8) चाकण येथील महात्मा फुले चौक येथे घडला आहे.

याप्रकरणी आशिष भैरवनाथ दुशिंग (वय 22 रा चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी मेहबूब नबी साहेब शेख( वय 22 रा चाकण) याला अटक केली असून अरफात वाजीत सिक्कीलकर (वय 19 रा.चाकण) याच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

Pune : संभाजी भिडे यांच्यावर कारवाई व्हावी, तुषार गांधी यांची डेक्कन पोलिसांकडे मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पेट्रोल पंपावर भांडण करणारा इसम हाच आहे म्हणत चिडून फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

यात तरुण जखमी झाला आहे. चाकण (Chakan) पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.