Pimpri : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर (Pimpri) लैंगिक अत्याचार करत तिला ब्लॅकमेल करणाऱ्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 14 एप्रिल 2019 ते 2021 या कालावधीत पिंपरी व लोणावळा या भागात घडला आहे.

याप्रकरणी पीडितेने बुधवारी (दि.9)पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अनिल मॅथ्यू आंचरील (वय 26 रा चिखली) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला लग्नासाठी (Pimpri) विचारणा केली, पुढे ओळख वाढली असता त्याने महिलेवर अत्याचार केले.

Chakan : जुन्या भांडणातून तरुणाला बेदम मारहाण

तसेच तिचे विवस्त्र फोटो काढून तिला धमकवण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी तिच्याकडून पाच लाख रुपये घेतले व ते परत न करता तिच्याशी लग्नही केले नाही.

आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच पिडीतेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.