Mhalunge News : भाजपा नेते पंकजा मुंडे यांच्या गाडीचे आमदार सुनील शेळके यांनी केले सारथ्य

एमपीसी न्यूज – म्हाळुंगे-नांदे येथे एका आयोजित कार्यक्रमासाठी भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुनील शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाला येताना पंकजा मुंडे यांच्या गाडीचे सारथ्य आमदार सुनील शेळके  यांनी केले . यावर बोलताना, ‘आमदार सुनील शेळके यांनी माझी गाडी चालवण्यात काही वावगं नाही. यातून काही अर्थ काढण्याची गरज नाही,’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

म्हाळुंगे-नांदे येथे एका कार्यक्रमाला माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुनील शेळके, आमदार महेश लांडगे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी येताना ज्या हॉटेलमध्ये पंकजा मुंडे थांबल्या होत्या तिथून पंकजा मुंडे यांच्या गाडीचे सारथ्य आमदार सुनील शेळके यांनी. याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केला, ‘सुनील शेळके यांना मी आपला भाऊ मानते, त्यांनी माझी गाडी चालवण्याचा आग्रह केला आणि हॉटेल ते कार्यक्रम स्थळापर्यंत त्यांनी माझी गाडी चालवली. यातून काही अर्थ काढायची गरज नाही,’ असे पंकजा मुंडे म्हणाले.

आमदार सुनील शेळके यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत असे म्हटले की, ‘पंकजा ताई यांची गाडी मी चालवली ही बातमी महाराष्ट्रात पोहचली असेल, पण आमच्यात एक जिव्हाळ्याचे नाते आहे. यातून माध्यमांनी राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही,’ असे शेळके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.