MNS News : महाराष्ट्र सैनिकांची माणुसकी ! लॉकडाउनच्या संकटात पडद्यामागच्या कलाकारांना दिला मदतीचा हात

एमपीसीन्यूज : लॉकडाऊन कालावधीत रोजगार बुडालेले पडद्यामागचे कलाकार, स्पॉट बॉय, सुरक्षारक्षक, सिलेंडर वाहतूक करणारे कर्मचारी आणि गोरगरीब नागरिक आदींना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्यावतीने जीवनावश्यक साहित्याचे किट, तसेच कोरोना योद्धे म्हणून जनसेवा करणारे दिवसरात्र व उन्हाच्या झळा सोसत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना फळांचे सरबत वाटप करून माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत 15  एप्रिलपासून लॉकडाऊन लागू केला. त्याच्या सर्वाधिक फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना बसला. रोजगार गेल्याने पडद्यामागच्या कलाकारांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर, कार्याध्यक्षा शालीनी ठाकरे, सरचिटणीस शशांक नागवेकर मनसे सरचिटणीस संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे चित्रपट सेनेचे चिटणीस संजय देवळे यांच्या सौजन्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना संयुक्त सरचिटणीस विशाल हळदणकर यांच्या पुढाकारातून मुंबईच्या अंधेरी आणि परिसरातील लॉकडाऊन कालावधीत रोजगार बुडालेले पडद्यामागचे कलाकार, स्पॉट बॉय, सुरक्षारक्षक, सिलेंडर वाहतूक करणारे कर्मचारी आणि गोरगरीब नागरिक आदींना जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यामध्ये दोन किलो तांदूळ, दोन किलो गव्हाचे पीठ, 1 किलो तूरडाळ, 1 किलो मीठ आदी साहित्य होते.

त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग – राज्य महामार्गावर कडक उन्हात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी फ्रुट ज्युसचे वाटप करण्यात आले. सिनेगृहात काम करणारे कर्मचारी यांनाही जीवनावश्यक साहित्याचे किट देत त्यांना आधार देण्याचे काम केले. 15 एप्रिलपासून आजपर्यंत जवळपास पाचशे नागरिकांना मदत देण्यात आली.

विशाल हळदणकर यांच्यासह महाराष्ट्र चित्रपट कामगार सेनेचे चिटणीस संजय देवळे, भगवंत झिटे, संदेश जगताप, सहचिटणीस राकेश गुरव, रोहित बेंद्रे ,वाहतूक सेना उपसंघटक बबन मानरे, मनोज बंगाले,  सचिन खंदारे, सुरज राठोड,  श्रीराम सोनवणे आदींच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे पडद्यामागच्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकट काळात मनसैनिक म्हणून आम्ही आमच्यापरीने जीवनावश्यक साहित्य देऊन त्यांना आधार दिला. राज्य सरकरनेही त्यांना तात्काळ आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.

विशाल हळदणकर : संयुक्त सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.