Sangvi : कुट्टीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – कुट्टीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या पती पत्नीला मारहाण करत पत्नीचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी साडेआठच्या सुमारास उपेंद्र मुरकुटे यांच्या गोठ्यावर पिंपळे सौदागर येथे घडली.

याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उपेंद्र चंद्रकांत मुरकुटे (रा. पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती आरोपी उपेंद्र याच्या पिंपळे सौदागर येथील गोठ्यावर कुट्टीचे पैसे मागण्यासाठी गेले. उपेंद्र याच्याकडे पैसे मागितले असता त्याने फिर्यादी महिलेच्या पतीला मारहाण केली. याचा जाब पीडित महिलेने विचारला असता उपेंद्र याने त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करून त्यांचा विनयभंग केला. यावरून पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार उपेंद्र याच्याविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.