Moshi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून (Moshi) दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 11) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तपकीरनगर, मोशी येथे घडली.

साजिद आब्बास शेख (वय 22), प्रशिक वाघमारे (वय 19), ज्ञानेश्वर वाघमारे, साहिल मोरे, नरेंद्र वऱ्हाडे, ऋतिक वाघमारे, कृष्णा वाघमारे (सर्व रा. मोशी), किरण प्रकाश डोंगरे (रा. पिंपरी), शाहबाझ मोगल, कृष्णा टमाटा (दोघे रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारस तापकीरनगर मोशी येथून जात होते. आरोपी प्रशिक वाघमारे याच्यासोबत फिर्यादी यांचे भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून प्रशिक याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून फिर्यादीस (Moshi) अडवले.

Chinchwad : बेटिंग प्रकरणी पाच जणांणा अटक; मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

शिवीगाळ करून कोयत्याने त्यांच्या डोक्यात, हातावर, पायावर मारले. तसेच फिर्यादी यांच्या मित्राला देखील शिवीगाळ करून त्याच्या तोंडावर, पायावर वार केले. तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारून गंभीर जखमी करत खुनी हल्ला केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.