Chinchwad : बेटिंग प्रकरणी पाच जणांना अटक; मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – लिंक रोड, चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Chinchwad) युनिट दोनने क्रिकेट बेटिंग प्रकरणी पुन्हा एकदा कारवाई केली. यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 11) रात्री पावणे नऊ वाजता करण्यात आली.

गोविंद प्रभुदास लालवानी (वय 45, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी), कन्हैयालाल सुगुणुमल हरजानी (वय 61, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी), देवानंद प्रतापराय दरयानी (वय 51, रा. तानाजीनगर, चिंचवडगाव), रमेश दयाराम मिरानी (वय 63, रा. पिंपरी), हरेश हनुमंत थटाई (वय 58, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सागर अवसरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लिंक रोड चिंचवड (Chinchwad) येथे मेट्रोपोलीटीन सोसायटीतील एका सदनिकेत क्रिकेट बेटिंग सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात दोन संगणक, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा 85 हजार 25 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आयपीएल सामन्यांवर लागते मोठी बोली –

सध्या आयपीएल क्रिकेट मॅचेस सुरु आहेत. मंगळवारी रात्री दिल्ली विरुद्ध मुंबई असा आयपीएलचा सामना होता. या सामन्यावर आरोपी बेटिंग घेत होते. फोनवर बेटिंग लावली जात होती. ग्राहक आरोपींना फोन करून कोणत्या टीमवर, टीममधील खेळाडूवर पैसे लावायचे याची माहिती देत, त्यानुसार आरोपी एका ठिकाणी बसून पैसे लावत असत. आयपीएल सामन्यांवर बेटिंगच्या मोठ्या बोली लागतात. दरवर्षी आयपीएल सुरु असताना अशा प्रकारच्या कारवाया झालेल्या पहायला मिळतात.

Summer News : उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे वापरावे? जाणून घ्या

तीन दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई –

पिंपरी परिसरात रिव्हर रोड येथे एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट बेटिंगवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली होती. शनिवारी (दि. 8) केलेल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तर त्या दोघांकडून 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. हे दोघेजण मोबाईल फोनवरून बेटिंग घेत होते. मुंबई विरुद्ध चेन्नई या आयपीएल सामन्यावर बेटिंग सुरु असताना पोलिसांनी कारवाई केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.