Summer News : उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे वापरावे? जाणून घ्या

एमपीसी न्यूज : उन्हाची चाहूल लागताच अनेकजण आपल्या (Summer News) आरोग्याची किंवा त्वचेची काळजी घेताना दिसतात. मात्र, अनेकजणांना आपल्या त्वेचेची काळजी कशी घ्यावी? हे समजत नाही. उन्हाळ्यात उन्हाने त्वचा काळी पडते. अंगावर पुरळ येते. अशा वेळी चिडचिड, अति घाम यामुळे तब्येतीवर परिणाम होतो. बाजारात यासाठी अनेक क्रीम आणि अनेक उपाय आहेत. परंतु, यावर मुख्य उपाय म्हणजे ऋतुमानानुसार योग्य कपडे वापरणे. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे कोणते कपडे वापरावे.

सुतीच कपडे वापरावे –

ऋतुमानानुसार योग्य कपडे वापरले तर आरोग्याची काळजी व्यवस्थित घेता येते. अनेकजण उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात सर्वाधिक सूती कपड्याचा वापर करावा. सुती कपड्यांमध्ये पाण्याचे शोषण जास्त असते, त्यामुळे आपला घाम त्यात शोषला जातो आणि वातावरणात सहजपणे बाष्पीभवन होतो. म्हणूनच उन्हाळ्यात सुती कपडे घालावेत.

काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे घालू नयेत – Summer News

लाल, काळा हे रंग टाळावेत. कारण हे रंग सूर्यकिरणांना शोषून घेतात. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणून गडद रंगाऐवजी गुलाबी, आकाशी, पांढरा, पिवळा हे रंग वापरण्यायोग्य आहेत. तसेच उन्हात ते शोभूनही दिसतात.

नायलॉनचे कपडे घालू नयेत –

नायलॉनचे कपडे उन्हाळ्यात शक्यतो टाळावेत. कारण या कपड्यांमध्ये घाम आणि उष्णता शोषून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळे अंगावर घाम तसाच राहतो. त्यामुळे पुरळ, घामोळे वाढतात. या शिवाय या कपड्यांच्या रखरखीमुळे एलर्जी देखील होते.

Akurdi : आकुर्डी ग्रेड सेपरेटरमध्ये अडकला 120 टनांचा कंटेनर

जाड किंवा वर्ख असलेले कपडे टाळावे –

अनेकजण उन्हापासून बचाव करण्यासाठी अथवा गाडी चालवताना टोपी, स्कार्फ, जॅकेटचा वापर करताना दिसतात. परंतु, यामुळे माणूस घामाघूम होऊन पुन्हा अंगावर पुरळ उठण्याची शक्यता असते. जाड जॅकेट, नायलॉनची ओढणी अथवा स्कार्फ प्रकर्षाने टाळावा. त्यासाठी बाजारात कॉटनच्या टोप्या, स्कार्फ आणि जॅकेट उपलब्ध आहेत. शिवाय जर रस्त्याने चालत असाल तर छत्रीचा वापर करावा.

फॅशनेबल फ्लोरल कपडे –

उन्हाळा म्हंटले, की फिरण्याचा ऋतू. या काळात अनेकजण पर्यटनास समुद्र किनारी जातात. यावेळी फ्लोरल कपडे घालावेत. स्त्रियांसाठी खास फ्रॉक आणि पुरुषांसाठी शर्ट ज्यावर फुलांची आणि पानांची छान अशी डिझाईन असलेले सूती कपडे बाजारात मिळतात. यामुळे एक छान लुक देखील निर्माण होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.