PCMC: उन्हाची तीव्रता वाढली, पण पालिकेचे 5 जलतरण तलाव कुलूप बंद

एमपीसी न्यूज – एप्रिल महिना सुरु झाला असून (PCMC) उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जलतरण तलावांवर पोहोण्यासाठी गर्दी होवू लागली. पण, महापालिकेचे 5 तलाव अद्यापही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळेगुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत 13 जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. एप्रिल महिना सुरू झाला असताना वातावरणातील तापमानही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून पोहोण्यासाठी जलतरण तलावांवर गर्दी होवू लागली आहे.

Wakad : व्यवसायासाठी पैसे घेत ज्येष्ठ नागरिकाची साडे सहा लाखांची फसणूक

महापालिकेच्या जलतरण तलावावर एक तास पोहण्यासाठी दहा (PCMC) रूपये शुल्क आकारण्यात येते. तसेच वयोगटानुसार तिमाहीसाठी 200 रूपये, सहामाहीसाठी 350 तर वार्षिक 500 रूपयापर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे पालिकेच्या तलावावर उन्हाळ्यात प्रचंड गर्दी असते.

मात्र, निगडी प्राधिकरण, थेरगाव, मोहननगर, सांगवी, भोसरी येथील जलतरण तलाव कुलूप बंद आहेत. या तलावांचे काम अजून सहा महिने सुरूच राहणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना, खेळाडूंना खासगी जलतरण तलावावर जास्त पैसे मोजून पोहण्यासाठी जावे लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.