Wakad : व्यवसायासाठी पैसे घेत ज्येष्ठ नागरिकाची साडे सहा लाखांची फसणूक

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी पैशांची गरज आहे (Wakad) म्हणत एका 60 वर्षीय नागरिकांची साडे सहा लाखांची फसवणूक कऱण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

शंकर चंद्रकांत मुरकुंबी (वय 60, रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.12) फिर्याद दिली असून सुनिल सुरवसे (वय 42 रा.चिंचवड) व राजा मनोरंजन (वय 54 रा.रावेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा सारा प्रकार 4 एप्रिल 2022 ते आजपर्यंत घडला आहे.

Pune : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या ओळखीचे आहेत. त्यांनी फिर्यादीला व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून 10 लाख रुपये (Wakad)  दोन महिन्यांकरीता एप्रिल 2022 मध्ये घेतले.

त्यातील आत्तापर्यंत केवळ 3 लाख 50 हजार रुपये आरोपीनी परत केले व उर्वरीत रक्कम 6 लाख 50 हजार रुपये न देता फिर्यादी यांची फसणूक केली आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.