Pimpri News : जलतरण तलावांची तिकीट विक्री ‘ऑफलाइन’च ठेवा – राहूल कोल्हटकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) वतीने जलतरण तलावाची तिकीट विक्री ऑनलाईन पद्धतीने चालू केली आहे. पण, ही प्रक्रिया खूप वेळकाढू आणि किचकट असल्याने ऑनलाइन सोबत पूर्वी प्रमाणे ऑफलाइन तिकीट विक्री चालू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राहूल कोल्हटकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, शहरातील जलतरण तलाव हे वैयक्तीक पातळीवर पोहण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजनासाठी घेण्यात येते. त्या शिबिरास मान्यता देताना संस्थेच्या वतीने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक तसेच जीवरक्षक यांचे प्रमाणपत्र तसेच कागदपत्र यांची तपासणी करूनच प्रशिक्षण शिबिरास मान्यता देण्यात यावी. शहरातील सर्व जलतरण तलावांवर मान्यता प्राप्त संस्थेच्या प्रशिक्षित प्रमाणपत्रधारक जीवरक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे का? याबाबत तपासणी करण्यात यावी.

सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने व मुलांच्या शाळेच्या सुट्टया लागल्या असल्याने सर्वच तलावावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे लहान मुलांना गर्दी असल्याने पोहण्याचा आनंद घेता येत नाही. दरवर्षी पोहोण्याच्या प्रशिक्षण शिबिरास हे तलाव देण्यात येतात.

Moshi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला

पण, त्यामध्ये काही प्रशिक्षक हे अनुभवी व मान्यताप्राप्त प्रमाणपत्र धारक असतात तर काही जण तर कसलाही अनुभव नसलेले सुद्धा प्रशिक्षण शिबिर घेतात. त्यांना मान्यता ही महापालिकेच्या वतीने देण्यात येते. संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये लहान मूले ही असतात. त्यामुळे काही चुकीची घटना घडू नये याकरिता शिबिरासाठी मान्यता देताना प्रशिक्षकांची मान्यता प्राप्त प्रमाणपत्र तसेच अनुभव याची पडताळणी करूनच प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यास मान्यता द्यावी.

महापालिकेच्या वतीने तिकीट विक्री ही ऑनलाइन पद्धतीने चालू केली असल्याने लहान मुले व त्यांच्या पालकांना (Pimpri News) नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण ऑनलाइन पद्धत ही खूपच वेळकाढू आणि किचकट असल्याने ऑनलाइन सोबतच पूर्वी प्रमाणे ऑफ लाईन पद्धतीने पण जलतरण तलावावर तिकीट विक्री चालू करून तिकीट विक्री प्रक्रिया सुलभ करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.