Moshi : वीज मिटर तपासणीसाठी आलेल्या महावितरण अभियंत्याला मारहाण

एमपीसी न्यूज – वीज पुरवठा बंद असलेल्या वीज मिटरच्या (Moshi) तपासणीसाठी आलेल्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला मारहाण कऱण्यात आली आहे. ही घटना मोशी प्राधिकरण येथे रविवारी (दि.12) दुपारी घडली.

याप्रकरणी उदय रामचंद्र भोसले (वय 56, रा. बावधन)  यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी रमेश बाबुराव थोरात (वय 41, रा. मोशी प्राधिकरण) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महावितरण येथे कार्यकारी अभियंता म्हणून काम करतात.  ते रविवारी वीज पुरवठा बंद असलेल्या मिटरची तपासणी कऱण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

Bhosari Crime : भांडणात महिलेचा विनयभंग, एकाला अटक

तसेच फिर्यादीचे सहकारी रमेश सुळ यांच्या कारच्या चाकाची (Moshi) हवा काढून सरकारी कामात अडथळा आणला.  यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.