Bhosari News : माफी मागण्यासाठी गेलेल्या दुध व्यावसायिकाला मारहाण

एमपीसी न्यूज सकाळी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीबद्दल (Bhosari News) माफी मागण्यासाठी गेलेल्या दुध व्यावसायिकाला तिघांनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. हि घटना शनिवारी (दि.11) भोसरीतील फुगेवस्ती येथे घडली.

 

याप्रकऱणी ज्ञानेश्वर उर्फ सागर उर्फ बारकु मारुती गवळी (वय 36 रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली असून विजय सतिश भोसुरे (वय 32 रा. भोसरी) व त्याचे दोन कामगार याच्यावर गुंन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Moshi : वीज मिटर तपासणीसाठी आलेल्या महावितरण अभियंत्याला मारहाण

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांचे आरोपीचे शॉप भोसुरे बिल्डिंग मटेरिअल अन्ड सन्स सप्लायर्स शॉप येथे शनिवारी सकाळी शाब्दीक बाचाबाची झाली होती. याच वादाची माफी मागण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपीन व त्याच्या कामगारांनी मिळून फिर्यादी यांना (Bhosari News) लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.