Moshi : भावाला मारहाण करत तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – भावाला मारहाण करून तरुणीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 31) सायंकाळी सहाच्या सुमारास मोशी येथे घडली.

याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बंटी बच्चे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी घरासमोर थांबली असताना आरोपी तिथे आला. त्याने तरुणीला ‘तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे.’ असे म्हणत तरुणीशी अश्लील वर्तन केले. तसेच आरोपीने फिर्यादी तरुणीच्या भावाला देखील हाताने मारहाण केली. यावरून पीडित तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलिसात तक्रार दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.