गांजा विक्री करणाऱ्या सासु-सुनेला 4 लाखाच्या गांजासह अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री करणाऱ्या सासु सुनेला पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 4 लाख रुपयांच्या गांजासह अटक केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि.3) लोणी काळभोर येथील सोरतापवडी येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अंमली पदार्थविरोधी पथकाला दोन महिला गांजा विक्रीसाठी गांजा घेऊन जात असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोरतापवाडी येथील चोरघे वस्ती येथे जात दोन्ही आरोपी महिलांना ताब्यात घेतले.

Pune News: ‘गुरुदक्षिणा’ चित्रप्रदर्शन बुधवारपासून; जलरंगातून साकारलेल्या आकर्षक कलाकृती पाहण्याची संधी

त्यांची झडती घेतली असता त्या नायलॉनच्या पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये सुतळीने बांधलेला तब्बल 4 लाख 12 हजार 200 रुपयांचा 20 किलो 610 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलिसांनी दोघी जवळील गांजा मोबाईल जप्त केला.दोघींवरही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन.डी.पि.एस. अक्ट अंतर्गत गुन्ह दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धायगुडे करत आहेत.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे 1 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव योगेश मोहिते यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.