MPC News Vigil : खुनाच्या प्रयत्नाच्या घटनांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत घट; अकरा महिन्यात 307च्या 102 घटना

एमपीसी न्यूज – मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी एकंदरीत (MPC News Vigil) गुन्ह्यांची आकडेवारी एक हजाराने वाढली आहे. गुन्ह्यांची आकडेवारी वाढली असली तरी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या अकरा महिन्यात 102 खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी हा आकडा 110 एवढा होता.

खुनी हल्ला करण्यामागे अतिशय किरकोळ कारणे समोर आली आहेत. दारू पिण्यास पैसे न देणे, जुने भांडण, प्रेम प्रकरण, नात्यातील संशय यासह चोरीच्या उद्देशाने खुनी हल्ला केल्याच्या घटना वर्षभरात घडल्या. नोव्हेंबर महिन्यात वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घटना घडली. त्यामध्ये प्रियकर ऐकत नाही, म्हणून प्रेयसीने त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.

Today’s Horoscope 13 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

कोयता, चाकू ही शस्त्रे सहज उपलब्ध होणारी आहेत. त्यामुळे तत्कालीन कारणावरून वाद होताच घराघरात असलेली अशी शस्त्रे बाहेर निघतात. रागाच्या भरात समोरच्याला संपवून टाकण्याची मानसिकता तयार होते. त्यातून त्याच्यावर हल्ला केला जातो. असेच अनेक प्रकार शहरात घडत आहेत.

काही प्रकरणे तर आरोपींच्या अंगलट सुद्धा आली आहेत. आठ मुली झाल्या म्हणून पती पत्नीला त्रास देत होता. म्हणून पत्नीने पतीला ठार मारण्यासाठी त्याच्यावर विष प्रयोग केले. हे विषप्रयोग फसल्याने पत्नीने घराजवळ राहणाऱ्या एका गुन्हेगाराला पतीच्या खुनाची सुपारी दिली. त्यातून गुन्हेगाराने एका साथीदारासोबत मिळून पतीवर तलवारीने वार केले.

पती रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्लेखोरांना वाटले की तो मरण पावला. मात्र पतीचे दैव बलवत्तर म्हणून तो जिवंत राहिला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु झाले. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि पोलीसांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर या हल्ल्यातील सूत्रधार पत्नी असल्याचे समोर आले.

चालू वर्षात सर्वाधिक खुनाच्या प्रयत्नाच्या घटना एप्रिल (18) आणि ऑगस्ट (15) महिन्यात घडल्या. तर सर्वात कमी घटना फेब्रुवारी (3) महिन्यात घडल्या. गेल्या 11 महिन्यात दाखल झालेल्या 102 गुन्ह्यांची 100 टक्के उकल झाली आहे. तर मागील वर्षी (MPC News Vigil) खुनाच्या प्रयत्नाचे 110 गुन्हे दाखल आहेत.

खुनाच्या प्रयत्नाच्या घटना –
जानेवारी – 5
फेब्रुवारी – 3
मार्च – 14
एप्रिल – 18
मे – 9
जून – 9
जुलै – 9
ऑगस्ट – 15
सप्टेंबर – 7
ऑक्टोबर – 7
नोव्हेंबर – 7

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.