Maval : पाणी योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा तसेच जनरल मोटर्स कामगारांना न्याय द्या – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – भविष्याचा विचार करुन जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजना ( Maval) राबविण्यात येत आहेत. ही योजना महत्त्वाची असून यामुळे माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरणार असून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी शेकडो कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. मावळ तालुक्यात 114 पाणी योजनांची कामे सुरु आहेत. परंतु कालावधी उलटूनही फक्त 27 योजना पूर्ण झाल्या आहेत.अधिकारी व ठेकेदार संगनमत करुन जाणीवपूर्वक दिरंगाई करीत आहेत. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत असुन पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट करून भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली.

 नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार सुनील शेळके यांनी मावळातील विविध विषय मांडुन सरकारचे लक्ष वेधले.

निगडे,कल्हाट,पवळेवाडी येथे मागील काही वर्षांपूर्वी एमआयडीसीचे शिक्के पडले.परंतु अद्यापपर्यंत या भागात उद्योग आले नाहीत.त्यामुळे स्थानिकांनाही काही करता येत नाही. तसेच या भागात इको-सेन्सिटीव्ह झोन देखील आहे.या भागातील हा झोन काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि उद्योग विभाग यांनी पुढाकार घ्यावा.

MPC News Vigil : खुनाच्या प्रयत्नाच्या घटनांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत घट; अकरा महिन्यात 307च्या 102 घटना

औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स कंपनीतील 882 कामगार मागील 71 दिवसांपासून आपल्या परिवारासह साखळी उपोषण करीत आहेत.तरी या ठिकाणी नव्याने येणाऱ्या ह्युंदाई मोटर्स कंपनीत या कामगारांना रोजगार मिळावा, या प्रश्नावर मार्ग काढून अधिवेशन संपायच्या आधी निर्णय घ्यावा आणि कामगारांना न्याय द्यावा,अशी आग्रही मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागासह दुर्गम डोंगराळ भागात विद्युत विभागाच्या मोठ्या प्रमाणात अडचणी उद्भवत आहेत. ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मर वारंवार चोरीला जात असून यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.नवीन ट्रान्सफॉर्मर मिळण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जाते.

वारंवार ट्रान्सफॉर्मर चोरीला जात असल्याने ही जबाबदारी कोणाची असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला.ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नवीन उपकेंद्र, विद्युत रोहित्र, वीज वाहिन्या सक्षम करण्यासाठी निधीची तरतूद करा,अशा विविध ( Maval) मागण्या त्यांनी मांडल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.