Alandi : हरिनामाच्या गजरात कार्तिकी यात्रेची सांगता

एमपीसी न्यूज – काल दि.12 रोजी रात्री माऊलींची छबिना पालखी  मिरवणूक ( Alandi )  निघाली. डोईवर वृंदावन ,खांद्यावर पताका,टाळ मृदंगाच्या गजरात ,नगारखानाच्या वाद्यात ,फटाक्याच्या अतिषबाजीत व हरिनामाच्या गजरात ,माऊलीच्या जयघोषात श्रींची नगर प्रदक्षिणा होऊन हजारो भाविकांच्या उपस्थित यार्षीच्या कार्तिकी वारी सांगता झाली.

Maval : पाणी योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करा तसेच जनरल मोटर्स कामगारांना न्याय द्या – आमदार सुनिल शेळके

श्रीं चा छबिना पालखी मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांनी प्रदक्षिणा रस्त्यावर गर्दी केली होती. यावर्षीच्या संजीवन सोहळ्याची व कार्तिकी वारीची सांगता झाल्यावर मान्यवरांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.यावेळी आळंदी देवस्थान कर्मचारी ,सेवक ,पोलीस प्रशासन व आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित ( Alandi ) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.