PCMC : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय; मुळशी धरणातील 760 एमएलडी पाणी आरक्षित करा

महापालिकेचे जलसंपदा विभागाला पत्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या सध्याचा लाेकसंख्या ( PCMC )  वाढीचा दर आणि सन 2041 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव पाण्याची गरज असल्याने मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी शहरासाठी आरक्षित करावे, अशा मागणीचे पत्र महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाला दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या चार वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत असताना लाेकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहराची सुमारे 30 लाखांच्या घरात लाेकसंख्या आहे. शहरासाठी पवना धरणातून 510, आंद्रातून 100, भामा-आसखेड धरणाचे 167 असे 777 एमएलडी पाणी आरक्षित आहे.

Alandi : हरिनामाच्या गजरात कार्तिकी यात्रेची सांगता

सध्या शहरवासियांना पवना धरणातून 510, आंद्रा धरणातून 75 आणि एमआयडीसीकडून 20 असे 605 एमएलडी पाणी देण्यात येत आहे. त्यानंतरही शहरातील विविध भागातील साेसायट्यांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

सध्याच्या लाेकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता शहराची 2031 मध्ये 52 लाख 74 हजार तर 2041 मध्ये 96 लाख 3 हजार लाेकसंख्या हाेईल, असे अनुमान गृहित धरण्यात आले आहे. या लाेकसंख्येला सुमारे 1500 एमएल़डी पाणी लागणार आहे.

त्यामुळे भविष्याचे आतापासून नियाेजन करणे काळाची गरज आहे. त्यानुसार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे.  मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी मिळावे, असे पत्र पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसंपदा विभागाला दिले ( PCMC ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.