Pune : पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे शहरात रात्री 1.30 वाजेनंतर देखील नाईट पार्टी सुरु ( Pune) असल्याचं समोर आल्याने  पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.

PCMC : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय; मुळशी धरणातील 760 एमएलडी पाणी आरक्षित करा

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवाना चे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणे  याकरिता या  10 नामांकित हॉटेल वर कारवाई करण्यात आली आहे.मागील आठ दिवसांपासून ही दंडात्मक कारवाई करण्यात ( Pune)  येत आहे.

पुण्यातील या हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करण्यात आली –

– प्लंज, कोरेगाव पार्क

– लोकल गॅस्ट्रो बार

– एलरो

– युनिकॉर्न

– आर्यन बार, बालेवाडी

– नारंग वेंचर

– हॉटेल मेट्रो

– लेमन ग्रास, विमाननगर

– बॉलर

– हॉटेल काकाज

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.