Pune : 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज होणार प्रारंभ

एमपीसी न्यूज – 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला  (  Pune) आज बुधवारी (दि.13 ) दुपारी 3 वाजता  तुकाराम दैठणकर आणि सहकारी यांच्या मंगलमय सनईवादनाने सुरुवात होईल. दरवर्षी देश विदेशातून शास्त्रीय संगीताचे हजारो चाहते या महोत्सवाला भेट देतात. महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो. रविवारपर्यंत हा संगीत महोत्सव रंगणार आहे.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी  महोत्सव रंगणार असून कार्यक्रमस्थळी भव्यदिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.

Pune : पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाई

तुकाराम दैठणकर आणि सहकारी यांच्या मंगलमय सनईवादनानंतर पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक संजय गरुड आपली गायनसेवा सादर करतील. पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत त्यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांचे गायन होईल. यानंतर सुप्रसिद्ध सरोदवादक तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे सुमधुर सरोदवादन संपन्न होईल. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता सुपरिचित गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात उदयोन्मुख आणि दिग्गज कलाकारांचा मिलाफ पाहायला मिळणार आहे.महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी कार्यक्रमानंतर रसिकांना रात्री घरी जाण्यासाठी मुकुंदनगरपासून भक्ती शक्ती चौक, सिंहगड रस्ता, कोथरूड डेपो आणि वारजे माळवाडी या मार्गांवर ‘पीएमपीएमल’ची विशेष बससेवा (  Pune) देखील उपलब्ध आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.