MPSC Result News : एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या उद्योग निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-2022 मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 6 उमेदवारांची या पदाकरिता शिफारस करण्यात आली (MPSC Result News ) आहे.

परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यातील नाना जोतिराम दडस हे राज्यातून व मागासवर्गवारीतून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून ठाणे जिल्ह्यातील भाग्यश्री भाऊसाहेब सांगळे ह्या प्रथम आल्या आहेत.

Kiwale :  किवळे  दुर्घटना ! अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आयोगाकडून सांगण्यात (MPSC Result News ) आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.