MPSC Result News : दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-2022 मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 9 उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे. ही परीक्षा 4 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे तर 25 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबई जिल्हा ( MPSC Result News) केंद्रांवर घेण्यात आली.

परिक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माने देशमुख अनिकेत सिद्धेश्वर हे राज्यातून प्रथम आले आहेत. सांगली जिल्ह्यातील साळुंखे अभिजीत अशोक हे मागासवर्गातून प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून कोल्हापूर जिल्ह्यातील कुपटे अक्षता महादेव या प्रथम आल्या आहेत.

Dighi : वसुलीसाठी आलेल्या रिकव्हरी एजंटला धमकावण्यासाठी गोळीबार

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आयोगाकडून सांगण्यात ( MPSC Result News) आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.