Mumbai News: पद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

या समितीमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्र्यांसह नऊ जणांचा समावेश आहे : Environment Minister Aditya Thackeray as the chairman of the Padma Awards Committee

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्र्यांसह नऊ जणांचा समावेश आहे.

कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्यक, सामाजिक सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे.

समितीत ‘या’ सदस्यांचा समावेश

आदित्य ठाकरे हे पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी या दोघांचीही या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.