Mumbai : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते.  त्यांच्यावर मुंबईतील (Mumbai) रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Maharashtra News : ‘एनडीआरएफ’चा बेसकॅम्प रायगड जिल्ह्यातच होणार – अजित पवार

जयंत सावरकर यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे.त्यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले.

त्यांची अनेक नाटके गाजली आहेत. ‘अपराध मीच केला’ (गोळे मास्तर), ‘अपूर्णांक’, ‘अलीबाबा चाळीस चोर’, ‘अल्लादीन जादूचा दिवा’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’ अशी अनेक नाटके त्यांची गाजली आहेत. ‘एकच प्याला’ नाटकातील त्यांची तळीरामांची भूमिका चांगलीच गाजली आहे.

30 हून अधिक अधिक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जयंत सावरकर यांनी 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते.

सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त (Mumbai) केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.