Mumbai : सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक डी. के. दातार यांचे निधन

एमपीसी न्यूज- हिंदुस्थानी संगीतात गायकीच्या अंगाने व्हायोलिन वाजविण्याची परंपरा रुजवणारे विख्यात व्हायोलिनवादक पंडित डी. के. दातार यांचे बुधवारी (दि. 10) रात्री मुंबईमध्ये निधन झाले. दातार यांच्या जाण्याने एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. दातार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात पत्नी डॉ. सुधा आणि दोन सुपुत्र डॉ. निखिल आणि डॉ. शेखर, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दामोदर केशवराव दातार उर्फ डी के दातार यांनी व्हायोलिनवादनाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. पं. डी. के. दातार यांच्या आधी कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. जवळपास 100 वर्षांची ही परंपरा मोडून व्हायोलिनवादन हिंदुस्थानी संगीतात रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले. पं. दातार यांना पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.