Maval : आढले बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव घारे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – आढले बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव घारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Maval) तर व्हाईस चेअरमनपदी नाथा सावळे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी कामकाज पाहिले.

 

यावेळी सचिव तुकाराम लोहर, डोणे तंटामुक्ती अध्यक्ष अशोकमहाराज कारके,मावळ तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संजय कारके,सरचिटणीस चंद्रकांत चांदेकर, पोलीस मिञ संघटना सचिव संदिप लांडगे,हभप अनिलमहाराज घारे, उपसरपंच पोपट वाडेकर,राष्ट्रवादी डोणे अध्यक्ष राहुल घारे, शेखर काळभोर, (Maval) समीर खिलारी,एकता प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कारके, सरपंच लहु सावळे,शरद घोटकुले, शहाजी घोटकुले,गोरख साठे,दशरथ साठे,विश्वनाथ घोटकुले,संजय खिलारी व आढले बु.,डोणे, दिवड, राजेवाडी व ओव्हळे गांवातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Talawade : लाईट गेली म्हणून महावितरण कार्यालयात केली खुर्च्यांची तोडफोड, सात जाणांविरोधात गुन्हा दाखल 

 

पवन मावळातील डोणे येथील वारकरी सांप्रदायातील एक ज्येष्ठ व आध्यात्मिक क्षेत्रांशी जोडलेली नाळ व गावातील तरुणांच्या पाठीमागे नेहमीच आधारवडासारखे उभे राहणारे अशी नामदेव घारे यांची ओळख आहे. 1993 ते 2003 मध्ये सलग 10 वर्षे  कास्प प्लॅन सामाजिक संस्थेचे माध्यमातून डोणे गावात विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली.

 

यामध्ये प्रामुख्याने पाणी याविषयावर मार्ग काढत संपुर्ण गावठाण आणि वाडीवस्तीवर संस्थेचे माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला. (Maval) तसेच गावातील प्रत्येक विद्यार्थ्यांला पाठ्यपुस्तके तसेच शाळेमध्ये जाण्यासाठी सायकल मिळवून देण्यासाठी प्रयत्न व सहकार्य केले तसेच शेतकऱ्यांना बैलगाडी ते शेतीअवजारे पर्यत संस्थेच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.त्याच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.