Pune Workshop : 7 ऑक्टोबर रोजी होणार राष्ट्रीय स्तरावरील एअर कंडिशनिंग तसेच रेफ्रिजरेशन क्षेत्रासाठी कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज : 7 ऑक्टोबर रोजी (Pune Workshop) इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअरच्या पुणे शाखे तर्फे पीवायसी हिंदू जिमखाना येथे राष्ट्रीय स्तरावरील एअर कंडिशनिंग तसेच रेफ्रिजरेशन क्षेत्रासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी पुणे स्मार्ट सिटीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉ. संजय कोलते (IAS) तसेच कृष्ण प्रकाश (IPS) स्पेशल आईजी व्हीआयपी सिक्युरिटी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. या कार्यक्रमासाठी स्मार्ट सिटी पुणेचे चीफ नॉलेज ऑफिसर अनिरुद्ध शिकारपूर हे विशेष पाहुणे सुद्धा उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी बांधकाम क्षेत्रातील तज्ञ रोहित सरदेसाई, युसुफ इनामदार, के रामचंद्रन, योगेश ठक्कर, प्रशांत देसाई, मिहीर संघवी, विक्रम मूर्ती, जावेद रफीक, यानिक हरभट तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
इशरे पुणे शाखेच्या 2006 मधील अध्यक्ष सुहास देशपांडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ACR TRENDZ या कार्यक्रमाचे यंदा सोळावे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर नोंदविण्यात आला आहे. यासाठी संपूर्ण भारतातून विविध तज्ञ मार्गदर्शन व संबोधन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून (Pune Workshop) सुभाष खानडे यांची नियुक्ती झाली असून त्यांना आशुतोष जोशी, चेतन ठाकूर, नंदकिशोर कोतकर, नंदकिशोर माटोडे, दीपक वाणी, वीरेंद्र बोराडे, उल्हास कोतपाल, अमित गुरुवाडे, अनुज गुप्ता, अरुण चिंचोरे, केतन चौधरी, सुबोध मुरकेवार, सिद्धांत जैन, विमल चावडा, विशाल पवार, शितल कुमार जवान दले, अभिजीत पवार, सिम्पल जैन, श्वेता देसले व इतर यांचे सहकार्य लाभले.
इशरे पुणे अध्यक्ष वीरेंद्र बोराडे यांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमासाठी बिझनेस कोच डॉक्टर योगेश पवार हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे दिस्तींग्विश लेक्चरसाठी मुंबईहून विख्यात सल्लागार प्रशांत देसाई तसेच के. रामचंद्रन उपस्थित राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.