Natyachata Spardha : दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत सहाशे स्पर्धकांचा विक्रमी सहभाग

एमपीसी न्यूज : नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित 31व्या कै. दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत पिंपरी-चिंचवड परिसरातील सहाशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी यंदाच्या वर्षी सहभाग घेत विक्रम नोंदविला. प्राथमिक फेरीतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरीची स्पर्धा ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात झाली.(Natyachata Spardha) यात याज्ञा पाटीलस्वरदा मोळकेआत्मज सकुंडेआराध्या हांडेअंतरा पाटील आणि माधवी पोतदार यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

दि. 20 आणि 21 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड परिसरातील तीन केंद्रांमध्ये प्राथमिक फेरीची स्पर्धा झाली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातील मनोहर वाढोकार सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे व्यवस्थापक आदित्य शिंदे,(Natyachata Spardha) मधुश्री कलाविष्कार संस्थेचे कार्याध्यक्ष सलीम शिकलगार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शिरूर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त प्रकाश पारखी, माधुरी ओक रंगमंचावर होते. सुरुवातीस प्रकाश पारखी यांनी नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Crime News : रस्ता दुभाजकाला धडकून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

आयुष्यातील स्पर्धेचे महत्व विषद करून सलीम शिकलगार यांनी नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे सातत्याने आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. (Natyachata Spardha) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुलांना संधी दिल्याबद्दल त्यांनी पालकांचे कौतुक केले.

आदित्य शिंदे म्हणाले, स्पर्धेत यश मिळाले नाही तरी हरकत नाही पण स्पर्धेत सहभाग घेणे फार महत्त्वाचे असते. स्पर्धेत सहभागी होता येणे हेच खऱ्या अर्थाने बक्षीस आहे. आयुष्यात चांगल्या पद्धतीने जगता येणे म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकास होय.

स्पर्धांमुळे आयुष्यातील ताल, तोल आणि लय सांभाळता येतात, असे मत दिपाली शेळके यांनी व्यक्त केले. कलेसाठी पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास येणारी पिढी सुसंस्कृत घडेल,(Natyachata Spardha) असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाट्यछटा स्पर्धेचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रसार केल्याबद्दल त्यांचा या वेळी प्रकाश पारखी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कानेटकर यांनी केले तर आभार पुष्कर देशपांडे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अशोक अडावदकर, उज्ज्वला केळकर, अजित देशपांड, नेहा कुलकर्णी, मंजिरी भाके यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)

शिशुगट : याज्ञा पाटील, सोहा सैंदाणे, अनिका खरे. उत्तेजनार्त – श्राव्या अमृतकर, स्वानंद गुजर, रिधीमा मोहिते.

पहिली-दुसरी : स्वरदा मोळके, श्रीमयी वायचळ, सावली यादव. उत्तेजनार्थ – अनुष्का काळे, गार्गी ठाकरे.

तिसरी-चौथी : आत्मज सकुंडे, अबीर विलणकर, रिया खैरनार. उत्तेजनार्थ – पर्वणी गाडे, नभा डेंगवेकर.

पाचवी ते सातवी : आराध्या डांडे, अवनिश निकम, ओम कळके. उत्तेजनार्थ – क्षितिज रणदिवे, कृष्णा रत्नपारखी.

आठवी ते दहावी : अंतरा पाटील, ऋतुजा माने, सरगम कुलकर्णी. उत्तेजनार्थ – अनन्य भेगडे, वरदा पाठक.

खुला गट : माधवी पोतदार, अनया फाटक, प्रियांका जाधव, भक्ती मोहोळ

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.