NCP : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पदवीधरांसाठी रोजगार मेळावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील तरुणांना स्वयंसिद्ध (NCP) होण्यासाठी भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे आणि पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने केवळ पदवीधर तरुणांसाठी रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अजित गव्हाणे बोलत होते.

Pune: स्वच्छ सर्वेक्षणाच्या लाखो रुपये खर्चावर भाजपची अनधिकृत जाहिरातबाजी 

आकुर्डी प्राधिकरण येथील प्रा. रामकृष्ण मोरे आर्ट्स अँन्ड सायन्स कॉलेजमध्ये शनिवार, दि. 16 मार्च  रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत शिबीर होणार आहे.  अधिक माहितीसाठी 8235909090 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

संधीचे सोने करुया… रोजगाराची कास धरुया

शेखर काटे म्हणाले की, राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच युवा नेते पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या संकल्पनेतून उद्योगनगरीतील तरुणांना स्वयंसिद्ध होण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून आम्ही निर्माण केली आहे. नामांकीत 60 कंपन्यांचे स्टॉल एकाच छताखाली लावण्यात येतील. त्यातून फार्मा एफएमसीजी, बँकींग, आयटी, रिअल इस्टेट, इन्शुरन्स, ॲग्रीटेक, हेल्थकेअर अशा विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे तरुणांनी संधीचे सोने करावे आणि रोजगाराची कास धरावी, असे आवाहन करीत (NCP) आहोत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.