Nepal : नेपाळमध्ये भूकंपामुळे विध्वंस, आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू, मृतांच्या आकड्यात सातत्याने वाढ

एमपीसी न्यूज : नेपाळमधील जाजरकोटच्या पश्चिम भागात (Nepal) शुक्रवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपात किमान 128 लोक ठार झाले तर अनेक लोक जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की शेकडो घरांची पडझड झाली.

मदत आणि बचावकार्य करत असलेल्या एजन्सींनी सांगितले की, भूकंपामुळे आतापर्यंत 128 लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या (Nepal) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

World Cup 2023 :अफगाणिस्तानची आगेकूच; नेदरलँडचा 7 गड्यांनी पराभव

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती एजन्सींना आहे. रात्रीमुळे काही भागातच बचावकार्य शक्य झाले आहे. उत्तर प्रदेशातील अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. राजधानी लखनऊसह अनेक शहरे आणि गावांमध्ये लोक घराबाहेर पडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.