Pune News : ‘सीएसआर प्रोफेशनल ऑफ द इयर अवार्ड-2022’ ‘सूर्यदत्त’चे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना प्रदान

एमपीसी न्यूज : नवी दिल्ली येथे नुकत्याच आयोजित केलेल्या नवव्या नॅशनल सीएसआर टाइम्स समिटमध्ये सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया (Pune News) यांना ‘सीएसआर प्रोफेशनल ऑफ द इयर अवार्ड-2022’ प्रदान करण्यात आला. ‘राष्ट्र उभारणीत सीएसआरचे योगदान’ या संकल्पनेवरील परिषदेत 300 पेक्षा अधिक डेलिगेट्स सहभागी झाले होते.

केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संकल्पनेवर आधारित ‘सीएसआरवर चर्चासत्रे झाली. त्या त्या क्षेत्रातील व्यावसायिक व तज्ज्ञ मंडळींनी सीएसआरमुळे राष्ट्राच्या उभारणीत कसा हातभार लागत आहे, याविषयी आपले विचार मांडले.

‘सीएसआर’च्या माध्यमातून शाश्वत विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि व्यावसायिक व व्यक्तिगत पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.(Pune News) प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘सीएसआर प्रोफेशनल ऑफ द इयर अवार्ड-2022’ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सीएसआर टाइम्सचे संपादक हरीश चंद्र, सेरेबियाचे राजदूत सिनिसा पॅव्हीक, खासदार जनार्दन सिंग सिंगरीवाल, ज्युरी चेअरपर्सन ए. के. त्यागी, सीएसआर टाइम्सचे संचालक शूल पानी, ज्युरी मेम्बर एस. रवि शंकर आदी उपस्थित होते.

Pimpri News : माजी नगरसेवक संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने पिंपरी करंडकचे आयोजन

एक जबाबदार नागरिक आणि शिक्षण संस्था म्हणून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने सीएसआरच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे शिक्षण देऊन त्यांना चांगला नागरिक घडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. एज्यु-सोशियो कनेक्ट उपक्रमांतर्गत अनेक समाजोपयोगी उपक्रम घेतले जातात.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सामाजिक व्यवस्थापन या तत्वावर आम्ही हे सगळे उपक्रम राबवत आहोत. कौशल्य विकास, जनजागृती कार्यक्रम, गरजू व गरीब, शेतकरी, (Pune News) लष्करी कर्मचारी यांच्या कुटुंबातील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, तसेच शासकीय सेवेतील व प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना सवलतीत शिक्षण दिले जाते.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.