Pune News : कवी वादळकार यांच्या “प्रेम क्लिनिक” या थिएटर शो मुळे रसिक आनंदी

एमपीसी न्यूज : नक्षlत्रांच देणं काव्यमंच निर्मित “प्रेम क्लिनिक” या थिएटर शो द बेस्ट थिएटर ,कर्वे नगर येथे बहारदारपणे संपन्न झाला. (Pune News) यावेळी कवी वादळकार यांच्या प्रेम कवितांची अनोखी काव्यमैफल संपन्न झाली.तरुण-तरुणींच्या मनावर आधिराज्य गाजविणा-या कवितांचा धूडगूस घालणा-या प्रेम कवितांची मैफल संपन्न झाली.

हा थिएटर शो रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला होता.त्यास रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.त्याच्या पासुन तिच्या पर्यंत,तिच्या पासुन त्याच्या पर्यंत प्रेमाचे संदेश पोहचविणा-या कवितांनी भरभरुन दाद दिली.प्रेमाच्या वादळी संदेश देणा-या कवितांचा रसिकांना आनंद मिळाला.अशा प्रेम कवितांचा हा प्रयोग आगळा वेगळा आहे.प्रेमाचे विविध रंग आम्हाला अनुभवयाला मिळाल्याची भावना उपस्थित रसिकांनी प्रतिक्रिया दिल्या.नविन प्रयोग आम्हाला “प्रेमक्लिनिकच्या”माध्यमातुन अनुभवता आला याचे रसिकांनी कौतुक केले.

Pune News : ‘सीएसआर प्रोफेशनल ऑफ द इयर अवार्ड-2022’ ‘सूर्यदत्त’चे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना प्रदान

 

वाटा जरी संपल्या,तरी दिशा अजुन बाकी आहे.तुझे माझे प्रेम संपले तरी आठवणी अजून ताज्या आहेत.

तरच तुझा आलेला फोनमाझा प्राण होता.कित्येक दिवस अडकलेला श्वास,आज माझा मोकळा झाला होता.

आणि प्रिये,मी तुला हवा हवा तसाच नवा नवा आहे.तुला पाहीजे तसाच मी अजून कोरा कोराच आहे.

अशा अनेक प्रेमाचे विविधरंग छटा भरणा-या कवितांचा आविष्कार प्रकट झाला.

या कार्यक्रमात वादळी कवितांचे वादळी सादरीकरण (Pune News) कवी वादळकार, पुणे यांनी केले.तसेच पार्श्वसंगीत ध्वनी अमोल देशपांडे यांनी दिले.कविता थिएटर आणुन तिला प्रतिष्ठा मिळावी यासाठी या शो चे आयोजन केल्याची माहिती प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.