New Mahabaleshwar: कोयनेच्या कुशीत वूडलॅन्ड एनक्लेव्ह भव्य गृहप्रकल्प ; निसर्गरम्य परिसरात  1, 2 आणि 3 बीएचके व्हिलाजचे स्वप्न करा साकार

एमपीसी न्यूज – नवीन महाबळेश्वर आशी ओळख निर्माण केलेल्या पाटण तालुक्यातील कोयना येथे वूडलॅन्ड एनक्लेव्ह भव्य गृहप्रकल्प उभारत आहे. एक एकर निसर्गरम्य परिसरात होत असलेल्या या गृहप्रकल्पात 1, 2 आणि 3 बीएचके व्हिलाजचे स्वप्न साकार होईल. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण, इतिहासाची साक्ष देणारे गड किल्ले आणि निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला नयनरम्य परिसर अशी या परिसराची ख्याती आहे. भविष्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प गुंतवणूकदारांना एक मोठी संधी घेऊन आला आहे.

सर्वदूर पसरलेली हिरवळ, स्वच्छ हवा, अल्हादायक आणि शांत वातावरण ही या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रकल्प सरकारमान्य इको फॉरेस्टच्या आवारात स्थित आहे. याचा अर्थ असा की, येणा-या काळात याठिकाणी कोणतेही बांधकाम होणार नाही. हा प्रकल्प तुम्हाला रेंटल्सच्या माध्यमातून भरघोस कमाईची हमी देतो. तसेच भविष्याच्या दृष्टीकोनातून  गुंतवणुकीची मोठी संधी देत आहे. या ठिकाणी गुंतवणूक केल्यास पुण्याच्या तुलनेत 19 ते 20 लाख रूपयांची बचत होणार आहे.

भाड्याच्या रूपाने कमाईची संधी मिळेल, कोयनेचा परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक या भागात भेट देत असतात. त्यांनी राहण्याची व्यवस्था पुरवून पैसे कमवता येतील. तसेच, याठिकाणी मेंन्टेनन्सचा पुण्याच्या तुलनेत अत्यल्प खर्च येतो. फ्लॅट बुकिंग केल्यास प्रत्येक बुकिंगवर 6 लाख किंमतीचे साहित्य फ्री मिळणार आहे. ज्यामध्ये फ्रिज, एसी, खुर्च्या, कपाट, फॅन, डायनिंग टेबल, सेंटर टेबल, शू रॅक यासारख्या अनेक वस्तू मिळणार आहेत.

कोयना परिसरात निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. याभागात तुम्हाला अनेक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणं नजीकच्या अंतरावर उपलब्ध आहेत. कोयना धरण, ऐतिहासिक घेरादातेगड, धारेश्वर, चाफळ, ओझर्डे धबधबा, पश्चिम घाट, शिवसागर तलाव आणि बरचं काही. याशिवाय चिपळूण, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर ही प्रमुख शहरे देखील जवळच आहेत. 32 गुंठ्यात क्लब हाऊस, डबल टॉयलेट, व्हरांडा, स्विमिंग पूल, लग्नासाठी हॉल, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, कॅम्पिंग एरिया अशा अनेक सुविधा या प्रकल्पात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

वूडलॅन्ड एनक्लेव्हमध्ये गुंतवणूक ही भविष्यासाठीची गुंतवणूक ठरणार आहे. त्यामुळे आजच फ्लॅट बुक करून संधीचे सोनं करा.

साईटचा पत्ता –

वूडलॅन्ड एनक्लेव्ह,

शिरळ, तालुका- पाटण (कराड – चिपळूण रोड)

जिल्हा सातारा, 415206

संपर्क – 8686373779 / 8686373776

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.