Maan News : हिंजवडी माण रस्त्यावर कार, दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – हिंजवडी माण रस्त्यावर कार, दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. द गार्डन स्पाईस हॉटेल समोर, माण, मुळशी येथे रविवारी (दि.27) रात्री आठ वाजता हा अपघात झाला.

अक्षय मारूती सोनटक्के (वय 24, रा. मारूंजी, मुळशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

अमोल भगवान खेकाळे (वय 30, रा. माण रोड, मुळशी) याने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी कार चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अक्षय सोनटक्के हे एमएच 14 जेपी 0368 ही दुचाकी घेऊन हिंजवडी कडून माणकडे जात होता. द गार्डन स्पाईस हॉटेल समोर आल्यावर अक्षय यांच्या गाडीचा कारला धडकून अपघात झाला. या अपघातात अक्षय सोनटक्के याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस ठाण्यात अनोळखी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.