New web series on drug addiction : ‘द नशा डायरीज’मध्ये दिसणार तरुणाईचे प्रतिबिंब

एमपीसी न्यूज – युवा अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तरुणाईमधील व्यसनांचा विळखा प्रकर्षाने जगासमोर आला. व्यसनांचे युवा वर्गामध्ये प्रचंड आकर्षण आहे. आकर्षणापोटी होणारी सुरुवात मग नंतर व्यसनात रुपांतरित होते. सुशांतच्या प्रकरणाला सध्या लागलेले वेगळे वळण पाहता सध्या संपूर्ण बॉलिवूड ड्रग्समुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेले असताना दिग्दर्शक योगेश पवारने ‘द नशा डायरीज’ नावाने वेब सिरीज दिग्दर्शित केली आहे.

या वेब सिरीज मध्ये कॉलेजची तरुणाई ड्रग्सच्या जाळ्यात कशी अडकते, त्यातून बाहेर कशी पडू शकते किंवा ड्रग्सचे सेवन केल्यास तुमच्यावर काय बिकट परिस्थिती येऊ शकते या सगळ्याच गोष्टी अनुभवायला मिळतील. त्यासोबत मनोरंजनाचा एक तडका सुद्धा त्यांनी दिला आहे. निर्माते जीवन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘द नशा डायरीज’ ही वेब सिरीज लवकरच आपल्याला ‘पिंग पॉंग’ ॲप वर बघायला मिळेल.

‘द नशा डायरीज’ची निर्मिती चंद्रभागा फिल्म प्रॉडक्शन्सने केली असून निर्माता म्हणून जीवन जाधव यांनी एक उत्तम विषय निवडला आहे. या वेब सिरीजमध्ये योगेश पवार, शिवराज वाळवेकर, हर्ष नय्यर, शाश्वती खन्ना, वैभव पगारे, भाग्यश्री बडकस, किरण पाटील आणि प्रशांत सिंघ यांनी प्रमुख भूमिका समर्पकपणे साकारल्या आहेत. तरुणाईमध्ये सध्या असणारी ड्रगची क्रेझ लक्षात घेऊन ड्रग अ‍ॅडिक्शन हा एक उत्तम विषय योगेश पवार आणि जीवन जाधवने निवडला आहे.

या वेबसिरीजमधून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला असून दिग्दर्शक योगेश पवार यांच्या म्हणण्यानुसार नुसतीच एक मनोरंजन कथा करण्यापेक्षा जर त्यामधून आपण सामाजिक संदेश देऊ शकलो तर आपली आपल्या देशासाठी एक छोटी मोलाची भागीदारी असू शकते. त्यामुळे आम्ही ड्रग ॲडिक्शन हा विषय त्यांनी निवडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.