Pune News : शिरूरमध्ये रस्त्यावर सापडले नुकतेच जन्मलेले बिबट्याचे पिल्लू

एमपीसी न्यूज : शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथील ऊर्जा दूध डेअरी जवळ असणाऱ्या रस्त्यावर रस्ता ओलांडताना एक नुकतेच जन्मलेले बिबट्याचे पिल्लू नागरिकांना सापडले. स्थानिक रहिवाशी या रस्त्याने जात असताना हे बिबट्याचे पिल्लू रस्त्याच्या या बाजूने रस्त्यापलीकडे असणाऱ्या उसामध्ये जाण्यासाठी रस्ता क्रॉस करत होते. 

काही दिवसांपूर्वीच जन्मलेलं हे बिबट्याचे पिल्लू आहे. स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे थोड्याच वेळात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी येतील आणि या बिबट्याच्या नवजात पिल्लाला घेऊन जातील अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

सध्या कडाक्याची थंडी असल्यामुळे हे बिबट्याचे पिल्लू गारठून गेले होतं. त्यामुळे हे पिल्लू काहीसे अशक्त जाणवत होते. स्थानिक रहिवाशांनी त्याला मिळण्यासाठी प्रयत्न केले तसेच त्याला दुध देखील पाजले. सद्यस्थितीत हे पिल्लू चांगल्या परिस्थितीत असून वनविभागाचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्याकडे या पिल्ल्याला सोपवण्यात येईल असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.