Nigdi : दुसऱ्याच्या यशात आनंद घेण्याचा स्थायी भाव कमी होतोय – सुनंदन लेले

एमपीसी न्यूज – प्रत्येक खेळ आपल्याला काहीतरी (Nigdi) शिकवीत असतो. तो दुसऱ्याच्या यशात आनंद घ्यायला शिकवतो. पण, सध्या हा स्थायी भाव कमी झालेला दिसतो, असे मत क्रिकेट समीक्षक व समालोचक सुनंदन लेले यांनी व्यक्त केले.

मॉडर्न शैक्षणिक संकुल निगडी येथील वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प सादर करताना क्रिकेटने मला काय शिकविले? या विषयावर ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, नियामक मंडळ सदस्य, दिपक मराठे तसेच व्यासपीठासमोर नियामक मंडळ सदस्य मृगजा कुलकर्णी, उद्धव खरे, डॉ. प्रविण चौधरी, राजीव कुटे, रणजित हगवणे, प्रमोद शिंदे, आजीव सदस्य डॉ शशिकांत ढोले, डॉ. अतुल फाटक, सतिश लिंभेकर आदी उपस्थित होते.

लेले म्हणाले की , जीवनातील यश अपयश गुणवत्तेवर अवलंबून नसते. त्याबरोबर सातत्यपूर्ण कष्ट मेहनत याची आवश्यकता असते. जीवनात यश अपयश अशा कोणत्याही परिस्थितीत मानसिक समतोल राखला पाहिजे, निर्णायक क्षणी योग्य वर्तन, सुसंवाद ठेवणे आवश्यक असते. अपयशाने खचून न जाता आपला सराव मेहनत वाढविली तरच आपण स्पर्धेत टिकू शकतो हा संदेश त्यांनी यातून दिला.

Pimple Nilakh : उसने पैसे मागितले म्हणून व्यावसायिकावर कोयत्याने वार

यावेळी सूत्रसंचालन वंदना धुमाळ यांनी केले प्रमुख पाहुणे (Nigdi) परिचय दीपा वायकोळे यांनी करवून दिला, तर आभार सुजाता कुलकर्णी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.