Pimple Nilakh : उसने पैसे मागितले म्हणून व्यावसायिकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज : महिलेला दिलेले उसने पैसे मागण्यासाठी कॉल केला (Pimple Nilakh) म्हणून महिलेच्या मुलाने व्यावसायिकावर कोयत्याने वार केले आहेत. हि घटना मंगळवारी (दि.25) पिंपळे निलख येथे भररस्त्यात सायंकाळी घडली.

याप्रकऱणी पोलिसांनी युवराज बलराम अग्रवाल (वय 23 रा.जुनी सांगवी) याला अटक केली असून अमोल सुभाष कामठे यांनी याप्रकऱणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maval : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी उपाययोजना करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीन फिर्यादीला कामासाठी फोन करत बोलावून घेतले. फिर्यादी भेटण्यासाठी गेले असता आरोपीने तू माझ्या आईला सारखा फोन का करतो, तिला पैसे का मागतो म्हणत विचारणा केली. यावेळी फिर्यादी यांनी सांगितले की, तुझ्या आईने माझ्याकडून आठ महिन्यांपर्वी एक लाख रुपये घेतले होते.

ते मागण्यासाठी फोन करत होता. याचा राग आल्याने आरोपीने कंपाऊडवॉलवर ठेवलला कोयता काढून फिर्यादीवर वार केला. त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केला. फिर्यादीच्या ओळखीचा एक जण आणि फिर्यादीचा भाऊ (Pimple Nilakh) मदतीसाठी धावून आले. यावरून सांगवी पोलीस ठाम्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.