Nigdi : वार्षिक स्नेहसंमेलनात शि. प्र. मंडळीच्या शाळेतील चिमुकल्यांनी सादर केले बहारदार नृत्य

एमपीसी न्यूज – शिक्षण प्रसारक मंडळीच्या (Nigdi) मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन 21 ते 23 डिसेंबरच्या दरम्यान पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी विविध नृत्य प्रकार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एमपीसीन्यूज चे संपादक विवेक इनामदार, लेखिका डॉ. माधवी महाजन उपस्थित होते.

स्नेहसंमेलनामध्ये प्रामुख्याने इयत्ता पहिली ते सातवीच्या 500 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध प्रदेश, भाषा, संस्कृती दर्शन सादर केले. चौथीतील विद्यार्थ्यांनी रखुमाई व मैत्री यावर सादरीकरण केले. इ. पाचवीतील विद्यार्थ्यांनी जीवनात कसे वागावे यावर आधारित ‘तू चाल पुढं’ यावर नृत्य बसवले. देशाविषयी असणारे प्रेम, भारतमातेची जपणूक दाखवून दिली. सहावीतील विद्यार्थ्यांनी मोबाईल कसे व्यसन आहे? त्याचबरोबर पाण्याचे महत्त्व सांगितले.

सातवी वर्गातील मुलांनी वाऱ्यावरती गंध पसरला, जीवन अपुले सार्थ करा रे हे गीत तसेच पालक व मुलांमधील संवाद कसा कमी झाला आहे? याचे पत्र वाचन करण्यात आले. पाहुण्यांनी त्यांच्या मनोगतातून शाळेचे कौतुक केले. मुलांचे, पालकांचे, शिक्षकांचे मनोबल वाढवले.

Alandi : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी माऊली मंदिर प्रशासन सतर्क; भाविकांना मास्कचे आवाहन

या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष दामोदर भंडारी यांच्या प्रेरणेतून समन्वयक रवींद्र मुंगसे, अश्विनी नामदे, मोनिका बोरसे, सांस्कृतिक प्रमुख मृणाल धसे, कविता फापाळे यांनी काम केले. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व सेवक यांच्या सहकार्याने उत्तम साजरे झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.