Alandi : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी माऊली मंदिर प्रशासन सतर्क; भाविकांना मास्कचे आवाहन

एमपीसी न्यूज : वर्षाअखेर (Alandi) सर्वच भक्त हे देवदर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. परंतु, कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या (आळंदी) वतीने 30 डिसेंबर रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी नागरिकांना आणि भाविकांना विनम्र आवाहन केले आहे.

चीन, अमेरिका, जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. या देशांमध्ये संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने आपल्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने सावधान राहण्याचा सूचना दिलेल्या आहेत. या संसर्गाचा संभाव्य फैलाव रोखणे हे शासनाबरोबर आपणा सर्वांचेही कर्तव्य आहे.

Talegaon : तळेगाव दाभाडे जवळील आंबी गावातून साडेआठ हजारांचा गांजा जप्त

तीर्थक्षेत्र आळंदी येथे येणारे भाविक, वारकरी, ग्रामस्थ व अन्य दर्शनार्थी (Alandi) तसेच व्यापक सामाजिक हित विचारात घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीच्या वतीने सर्वांना विनम्र आवाहन करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी व मंदिर परिसरात गर्दी करू नये. वयोवृद्ध, लहान मुले तसेच आजारी व्यक्ती यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मंदिर व मंदिरात सर्वांनी मास्क घालून प्रवेश करावा. मंदिर प्रसाशनाच्या वतीने असे आवाहन करण्यात आले असून कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नाही.

नागरिकांनी भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.