Nigdi : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त निगडी प्राधिकरण येथे रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, निसर्गराजा मित्र जीवांचे, सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा.लि. पुणे आणि प्रांत पोलिसिंग मित्र संघ यांच्या संयुक्त विद्यमाने (Nigdi) निगडी प्राधिकरण येथील गजानन महाराज मंदिर परिसरात सोमवारी (दि.13) श्री गजानन महाराजांच्या 145 व्या प्रकट दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे आपण मानतो आणि त्यामुळेच महाराजांच्या प्रकटदिनी मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना रक्तदान रुपी सेवा श्रींच्या चरणी अर्पित करता यावी, या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंटचे डायरेक्टर अमोल शिंगटे, विशाल वडजकर, डी. वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या डॉ.मेघना भिलारे यांनी केले.

श्रींच्या प्रकट दिनी शिबीर आयोजित करण्याचे हे पहिलेच वर्ष होते. नियमित रक्तदात्यांसोबतच नवीन रक्तदात्याना प्रोत्साहन देणे तसेच महिलांनीही रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन करण्याचा संस्थांचा उद्देश असतो. या वेळी एकूण 139 जणांनी रक्तदान केले यामध्ये 32 लोकांनी पहिल्यांदाच रक्तदान करण्याची सेवा केली.

तसेच, 15 महिलांनीही रक्तदान केले. डी. वाय. पाटील रक्तपेढी, पिंपरी यांचे (Nigdi) रक्तसंकलन करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. तसेच डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पिंपरीचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते.

या शिबिराच्या आयोजनासाठी पोपटराव जठार यांनी जागा उपलब्ध करून दिली, तसेच सुभाष माळी, आर एच पिसे, बी बी खडसे, डी पी हरमकर, रवी मिरजी, रसिक पिसे, अनुराग वाघ, प्रसाद वाघ, अभिजित बुधले, उदय निकम, सुधीर वरपे, अशोक मोरे, गोपाल बिरारी, संदेश लाड या सर्वांनी शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.