Nigdi : महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – बस पकडताना महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची साखळी चोरटयांनी हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 20) दुपारी साडेबाराच्या सुमारास निगडी येथे घडली.

संजीवनी ज्ञानेश्वर देवकर (वय 54, रा. यमुनानगर, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवकर पवळे उड्डाणपूल येथून पीएमपीएमएल बस ने प्रवास करत होत्या. त्यांनी पवळे पुलापासून निगडी- वाघोली बस पकडली. बस पकडत असताना अज्ञात चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.