Nigdi : सोसायटीच्या जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी नागरिकांची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या जागेत अतिक्रमण (Nigdi) केल्याची तक्रार श्री नगरी रो हाऊस को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसात केली आहे. सोसायटीच्या रिकाम्या जागेत बांधकाम करून सभासदांना त्रास देत असल्याची तक्रार सोसायटीने पोलिसात दिली आहे.

श्री नगरी रो हाऊस को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीकडून पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोसायटीच्या मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकाम सुरु करण्यात आले असून त्याबाबत सोसायटीकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे तक्रार केली होती. कंटोन्मेंट बोर्डाने तानाजी देशमुख आणि प्रशांत आरदवाड यांच्याकडून सुरु असलेले बांधकाम काढण्यास सांगितले होते.

Pune : नमो महारोजगार मेळाव्यात 43 हजार पदे अधिसूचित; मेळाव्याच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

या मोकळ्या जागेत कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मज्जाव करत जागेचा उपयोग सोसायटीच्या सभासदांच्या संमतीने करावा, असेही कॅन्टोन्मेंट बोर्डाने सांगितले (Nigdi) होते. तरीही सोसायटी मधील काही सदस्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आदेशाला धुडकावून अनधिकृत बांधकामाला सुरुवात केली आहे.

संबंधित जागेत सोसायटी मधील मुलांना खेळण्यास मज्जाव करणे, महिलांना अपशब्द वापरणे, पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला पाईप लाऊन अनधिकृत नळ जोडणी घेणे, सोसायटीच्या सभासदांना वारंवार धमकावणे, मोकळ्या जागेत वाहने लावण्यास मज्जाव करून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.