Nigdi : कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीच्या शासन निर्णयाची होळी

एमपीसी न्यूज – शासकीय नोकर भरती कंत्राटी (Nigdi) पद्धतीने करण्याच्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या शासन निर्णयाची छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने होळी करण्यात आली. एकीकडे मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरला असताना दुसरीकडे हा निर्णय घेऊन सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.

निगडीतील तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात धनाजी येळकर-पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते. शासकीय नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने नुकताच घेतला आहे.

एकीकडे मराठा आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरला असताना दुसरीकडे हा निर्णय घेऊन सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळले आहे. तर, कंत्राट पद्धतीमुळे आरक्षणाला अर्थ राहणार नाही असा दिशाभूल करणारा संदेश तरुणांना अप्रत्यक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे.

Maratha Reservation : लढ्याला 100 टक्के यश येणार पण उपोषण मागे घ्या; भिडे गुरुजींचे मनोज जरांगे यांना आवाहन

हा सरकारचा डाव, कूटनीती आणि  (Nigdi) चुकीच्या कार्यपद्धीचाच आरसा आहे. हा निर्णय सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणीवर अत्यंत अन्याय करणारा आणि समाज विघातक, चुकीचा आहे. याचे प्रचंड दुष्परिणाम भविष्यात होणार आहेत. त्यामुळे सरकारच्या या शासन निर्णयाचा निषेध करत शासन निर्णयाची होळी केल्याचे महासंघाच्या पदाधिका-यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.