Audi India : ऑडी इंडियाकडून सणासुदीच्‍या काळासाठी लिमिटेड एडिशन ‘ऑडी क्‍यू 8’ लाँच

एमपीसी न्यूज : ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने (Audi India) आज सणासुदीच्‍या काळाची उत्‍साहात सुरूवात करण्‍यासाठी स्‍पेशल एडिशन ऑडी क्‍यू 8 च्‍या लाँचची घोषणा केली. ऑडी क्‍यू 8 स्‍पेशल एडिशन फक्‍त मर्यादित इन्‍व्‍हेंटरीसह मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट आणि डेटोना ग्रे या तीन आकर्षक रंगांमध्‍ये सादर करण्‍यात येईल, ऑडी क्‍यू८ स्‍पेशल एडिशनची किंमत 1,18,46,000 रूपये एक्‍स-शोरूम आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “ऑडी क्‍यू 8 आमच्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओमधील सर्वात वैविध्‍यपूर्ण एसयूव्‍ही आहे. आम्‍हाला आरामदायीपणा, आकर्षकता व तंत्रज्ञान-संपन्‍न अनुभवाचे संयोजन असलेली कार पाहत असलेल्‍या ग्राहकांसाठी लिमिटेड एडिशन ऑडी क्‍यू८ च्‍या लाँचसह सणासुदीचा काळ सुरू करण्‍याचा आनंद होत आहे.”

वैशिष्‍ट्ये:

कार्यक्षमता: Audi India

· 3.0 लीटर टीएफएसआय, 340 एचपी, 500 एनएम, बीएस-6 प्रमाणित, 48व्‍ही माइल्‍ड हायब्रिड.

· 5.9 सेकंदांमध्‍ये 0 ते 100 किमी/तास गती प्राप्‍त करते. अव्‍वल गती 250 किमी/तास

· जलद व सुलभपणे शिफ्ट करता येणारे एट-स्‍पीड टिप्‍ट्रॉनिक ट्रान्‍समिशन.

· क्‍वॉट्रा परमनण्‍ट ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह.

· सस्‍पेंशनसह डॅम्‍पर कंट्रोल.

· इलेक्‍ट्रोमेकॅनिकल पॉवर स्‍टीअरिंग

· ऑटो ड्राइव्‍ह सिलेक्‍टसह 7 ड्रायव्हिंग मोड्स, ज्‍यामध्‍ये ‘इंडीव्हिज्‍युअल’ मोडचा समावेश.

एक्‍स्‍टीरिअर:

· तीन आकर्षक रंग: मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट आणि डेटोना ग्रे.

· स्‍पोर्टी डिझाइन आणि अभूतपूर्व अपस्‍केल प्रेस्टिज.

· अष्‍टकोनी डिझाइनमध्‍ये सिंगलफ्रेम ग्रिल.

· व्‍यापक सी-पिलरचा आकार व रचनेमध्‍ये रेस-विनिंग क्‍वॉट्रो कार्सच्‍या आठवणी दिसून येतात.

· फेण्‍डरचे फ्लेअरचे दरवाज्‍याच्‍या मध्‍यभागापासून सुरू होते आणि अधिक पुढे जात रिअर लिफ्ट गेटसह

· आकर्षकरित्‍या सामावून जाते.

· पॅनोरॅमिक सनरूफ आणि फ्रेमलेस डोअर्स.

· स्‍टॅण्‍डर्ड एचडी मॅट्रिक्‍स एलईडी टेक्‍नॉलॉजीसह डायनॅमिक इंडीकेटर्स रात्रीच्‍या वेळी प्रखर प्रकाशाची

· खात्री देतात. (Audi India)

· सतत संचालित एलईडी स्ट्रिपसह डायनॅमिक इंडीकेटर्स.

· स्‍पोर्टी लुकसाठी एस-लाइन एक्‍स्‍टीरिअर पॅकेज.

· प्रोनाऊन्‍ड एअर इनटेक्‍स आक्रमक एसयूव्‍ही विशिष्‍टतेमध्‍ये अधिक भर करतात.

· एक्‍स्‍टीरिअरमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करण्‍यासाठी ब्‍लॅक स्‍टाइलिंग पॅकेज प्‍लस.

· ब्‍लॅक रूफ रेल्‍स.

· ब्‍लॅकमध्‍ये सिंगलफ्रेम मार्क.

· प्रिमिअम दर्जा वाढवण्‍यासाठी आर 215-स्‍पोक ग्रॅफाईट ग्रे डायमंड फिनिश अलॉई व्‍हील्‍स.

इंटीरिअर्स:

· रॅप अराऊंड डिझाइन.

· उच्‍च दर्जाचे केबिन ‘ऐरो-अकॉस्टिक्‍स’.

· ड्रायव्‍हर-केंद्रित कॉकपीट डिझाइन.

· बटन-लेस एमएमआय नेव्हिगेशन सिस्‍टमसह टच रिस्‍पॉन्‍स.

· फोर-झोन एअर कंडिशनिंगसह वैयक्तिकृत कूलिंग कम्‍फर्ट.

Talegaon Dabhade : अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिरासाठी मावळातून स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल

वैशिष्‍ट्ये:

· एमएमआय व टच रिस्‍पॉन्‍स – 2 स्क्रिन्‍स, प्रायमरी (25.65 सेमी) व सेकंडरी (21.84 सेमी).

· हॅप्टिक व अकॉस्टिक फिडबॅक.

· एमएमआय सर्च – फ्री टेक्‍स्‍ट सर्च.

· ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट.

· नॅच्‍युरल लँग्‍वेज इंटरअॅक्‍शनसह स्‍पीड डायलॉग सिस्‍टम.

· अॅडवान्‍स्‍ड हँडरायटिंग रिकग्निशन – व्‍होल वर्ड रिकग्निशन.

· सेकंडरी स्क्रिनवर शॉर्टकट्ससाठी प्रोव्हिजन.

· ऑडी फोन बॉक्‍स लाइटसह वायरलेस चार्जिंग.

· बीअॅण्‍डओ प्रिमिअम साऊंड सिस्‍टमसह 3 डी साऊंड.

· ऑडी म्‍युझिक व स्‍मार्टफोन इंटरफेस.

सुरक्षितता:

· ऑडी प्री-सेन्‍स बेसिक.

· 8 एअरबॅग्‍ज.

· ऑडी पार्क असिस्‍टसह पार्किंग एड प्‍लस.

· रिअर व्‍ह्यू कॅमेरा.

· इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलायझेशन प्रोग्राम.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.