Nigdi : प्राधिकरण येथे सकल जैन वर्षायोग समितीच्या वतीने दशलक्षण पर्व महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज- सकल जैन वर्षायोग समितीच्यावतीने दशलक्षण पर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव दि. 14 ते 24 सप्टेंबर या कालाधीत होणार असल्याची माहिती पूलकसागर महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

निगडी प्राधिकरण येथे जैन मंदिरात हा महोत्सव होणार असून यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. त्यात अभिषेक पूजन, महाआरती, ध्यान सामायिक आदी कार्यक्रम होणार आहे.

यावेळी दशलक्षण पर्वाचे महत्व पूलकसागरजी महाराज यांनी सांगितले. ते म्हणाले,”दशलक्षण पर्वात क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य या दशधर्मांचे पालन, चिंतन आणि मनन श्रावक व श्राविकाही त्याच निष्ठेने करतात, विशेषत: क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप,त्याग, आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य या दहा दशधर्मांचे या विशेष स्वरूपाच्या पर्वकाळात चिंतन, मनन किंवा व्याख्यान चर्चा या महोत्सवा दरम्यान केली जाणार आहे. तरी भक्तांनी जास्तीत जास्त संख्यने या महोत्सवात सहभागी व्हावे असे पूलकसागर महाराज म्हणाले. आत्मशुद्धी करण्याला अतिशय अनुकूल असा पर्वकाल असल्याने तो पर्वराज म्हणूनही ओळखला जातो. या महोत्सवााचा लाभ नागरिकांनी घ्यावा”असे आवाहन यावेळी करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.