Nigdi : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकमान्य टिळक यांचे योगदान महत्त्वपूर्ण – उल्हास जगताप

एमपीसी न्यूज – लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील (Nigdi) थोर स्वातंत्र्यसैनिक आणि प्रखर देशभक्तही होते, त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करून इंग्रजांविरुद्ध पुकारलेले बंड सर्वश्रुत आहे. त्यांना असंतोषाचे जनक म्हणूनही संबोधले जाते असे सांगून टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेला तुरुंगवास आणि जनजागृतीसाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन अतिरीक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

Pune : “सांबार” हॉटेलची फ्रेंचाइजी देतो असे सांगून 30 लाख रुपयांची फसवणूक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी जगताप बोलत होते.

 

 

या अभिवादन कार्यक्रमास माजी नगरसदस्य सचिन चिखले, अमित गावडे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, शर्मिला बाबर, कमल घोलप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उप अभियंता विजय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते बाळा दानवले आदी उपस्थित होते.

लोकमान्य टिळक यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून इंग्रजांविरुद्ध शेकडो लेख लिहून देशभक्तांना प्रेरणा आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला दिशा दिली असे सांगून भावी पिढीने टिळक यांच्या देशभक्तीचा वारसा जोपासला पाहिजे असेही जगताप (Nigdi) म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.