Nigdi News : सेक्टर 12 मधील गृह योजनेच्या लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी 31 ऑगस्ट अंतिम मुदत

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सेक्टर 12 येथील गृह योजनेसाठी 21 मे 2021 रोजी ऑनलाईन सोडत झाली. सोडतीद्वारे निवडलेल्या लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी 01 जुलैपासून सूरु आहे. पण, अद्याप 1 हजार 190 लाभार्थी कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे तपासण्यासाठी अंतिम मुदत राहणार आहे.

PMRDA च्या वतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून, 1 हजार 190 लाभार्थी कागदपत्रे तपासणीसाठी अनुपस्थित राहिल्याचे यात म्हटले आहे. कागदपत्र तपासणीस अनुपस्थित लाभार्थ्यांची यादी https://lottery.pcntda.org.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदनिका लाभार्थ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत कागदपत्रे तपासणीसाठी आवश्यक कागदपत्रासह PMRDA निवारा केंद्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, सेक्टर 24, निगडी चौक, निगडी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 31 ऑगस्टपर्यंत लाभार्थी कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित न राहिल्यास त्यांचे सदनिका वाटप रद्द केले जाईल व यानंतर त्याबाबतचा कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही व प्रतिक्षायादीवरील लाभार्थ्यांना त्याचे वाटप केले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.