Nigdi : निगडी पीएमपीएमएल पास केंद्राची तोडफोड, प्रशासनाने कडक कारवाई करण्याची  मागणी

एमपीसी न्यूज –  निगडी येथीाल पीएमपीएमएल बस स्टॉप (Nigdi) परिसरात रात्री गर्दुल्यांचा वावर असतो. त्यातूनच परिसरात सतत चोरी किंवा तोडफोड होते. एका टोळक्याने बुधवारी (दि.15) रात्री पास केंद्राच्या काचा फोडून नुकसान केले आहे, तरी प्रशासनाने त्वरीत यामध्ये लक्ष घालून संबंधितावर कडक कारवाई करावी , अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.

सचिन काळभोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील पीएमपीएल बस स्टॉप या ठिकाणी काल रात्री दारू पिऊन धिंगाणा घालत काही टोळक्याने पी एम पी एल पास केंद्र तोडफोड केली असून त्या संदर्भात पी एम पी एल बस मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना निगडी बस स्टॉप या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत तसेच पी एम पी एल बस स्टॉप या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली आहे.

Pimpri : प्रसाद सस्ते यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पिंपरी चिंचवड शहरातील मुंबई पुणे महामार्गावर निगडी बस स्टॉप खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असलेलं ठिकाणं असून पिंपरी चिंचवड शहरातील तसेच पुणे शहरातील भागात बस प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी निगडी बस स्थानक ह्या ठिकाणी येत असून त्या निगडी बस स्टॉप या ठिकाणी बसमध्ये प्रवासी चढत असताना तसेच प्रवासी बसमधून उतरत असताना  मोबाईल चोरी घटना वारंवार घडत आहेत.

निगडी बस स्टॉप या ठिकाणी पी एम पी एल बस मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ताबडतोब दखल घेऊन  या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत  तसेच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली.

काल रात्री दारू पिऊन रसवंती गृहात बसलेल्या तरुणांनी पी एम पी एल बस पास केंद्राची तोडफोड केली. त्या संदर्भात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा , निगडी बस स्टॉप या ठिकाणी चारही बाजूंनी अतिक्रमण करून टपरी पथारी धारक यांनी अतिक्रमण केले आहे.

त्यामुळे प्रवासी बांधवांना बस स्टॉप या ठिकाणी बसमध्ये चढताना व उतरताना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे.  तरी प्रशासनाने या संबंधी कडक कारवाई करावी अशी मागणी, काळभोर यांनी केली (Nigdi) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.